अल्पवयीन मुलगी 7 महिन्यांची गर्भवती

प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
boyfriend sexual assault अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रियकराने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. पाेट दुखत असल्यामुळे ती आईसाेबत दवाखान्यात गेली असता डाॅक्टरांनी गर्भवती असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या घटनेचे बींग फुटले. या प्रकरणी आईने पुढाकार घेऊन पाेलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी पाेलिसांनी आराेपीविराेधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.
 

boyfriend sexual assault 
काेराडी हद्दीत राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आराेपी अफसर उर्फ रऊफ खान (वय 19, रा. कपिलनगर) साेबत प्रेमसंबंध हाेते. 1 जून 2025 ते 26 मार्च 2026 च्या दरम्यान आराेपीने मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला गाेडीगुलाबीने काेराडी हद्दीतील कामठी ते अमरावती राेडवरील निर्जनस्थळी नेले. तिच्यासाेबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्यानंतर आराेपीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासाेबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पाेट दुखत असल्याच्या कारणावरून जेव्हा तिला आईने दवाखान्यात नेले, तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. boyfriend sexual assault  याप्रकरणी 27 मार्च राेजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून काेराडी पाेलिसांनी आराेपीविरुद्ध कलम 64 (2) (एम), 88 भान्यासं, सहकलम 4, 6, 8 पाेक्साे कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.