विद्यापीठाच्या बुटी हॉलला मिळणार नवे रूप

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे रामदासपेठ येथील ग्रंथालयाजवळ असलेल्या ‘पूर्णचंद्र बुटी हॉल’च्या नूतनीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकेकाळी विद्यापीठाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र असलेला हा हॉल गेल्या काही वर्षांत दुर्लक्षित राहिल्याची भावना व्यक्त होत होती.
 

Nagpur University 
सिनेटचे ज्येष्ठ सदस्य अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी विद्यमान बुटी हॉलच्या जागी आधुनिक सुविधांनी युक्त बहुमजली इमारत उभारण्याचा प्रस्ताव मांडला Nagpur University आहे. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी या प्रस्तावाला तात्काळ मान्यता देत सुरुवातीला नूतनीकरणाचे काम हाती घेण्याचे स्पष्ट केले.विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुटी हॉल हे नागपूरच्या मध्यवर्ती भागात स्थित असून, अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणींशी निगडित आहे. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विद्यार्थी राजकारणाचीही समृद्ध परंपरा राहिली आहे.वाजपेयी यांनी नमूद केले की, या जागेचा विकास करताना विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणारी आधुनिक इमारत उभारणे गरजेचे आहे. या निर्णयामुळे बुटी हॉलला नवसंजीवनी मिळणार असून, विद्यापीठाच्या सांस्कृतिक जीवनाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.