पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. विजयपत सिंघानिया यांचे निधन

उद्योग आणि विमानचालन क्षेत्रातील दिग्गज हरपला

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Dr. Vijaypat Singhania passes away पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, डॉ. विजयपत कैलाशपत सिंघानिया यांचे शनिवारी सायंकाळी मुंबईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे उद्योग, समाजकारण आणि विमानचालन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. सिंघानिया हे दूरदृष्टी असलेले उद्योगपती, समाजहितासाठी कार्य करणारे व्यक्तिमत्त्व आणि प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. १९८० ते २००० या काळात त्यांनी रेमंड समूहाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंड ब्रँडला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली.
 
Dr. Vijaypat Singhania passes away
 
व्यवसायासोबतच डॉ. सिंघानिया यांना विमानचालनाची विशेष आवड होती. हॉट एअर बलूनद्वारे सुमारे ६९,००० फूट उंची गाठत त्यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला. तसेच मायक्रोलाइट विमानातून लंडन ते दिल्ली असा ऐतिहासिक प्रवास करत त्यांनी धाडसी विक्रम नोंदवला. Dr. Vijaypat Singhania passes away या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘टेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सिंघानिया यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी दिली असून, सोशल मीडियावर “ओम शांती” अशा शब्दांत श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यदर्शनासाठी आज दुपारी १.३० वाजता हॅवेली, एल. डी. रुपारेल मार्ग येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता चंदनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
 
प्रसिद्ध सिंघानिया कुटुंबातील सदस्य असलेल्या डॉ. सिंघानिया यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग उद्योगवृद्धी आणि नव्या संधी निर्माण करण्यासाठी दिला. Dr. Vijaypat Singhania passes away २०१५ मध्ये त्यांनी रेमंड समूहातील आपला हिस्सा मुलगा गौतम सिंघानिया यांना हस्तांतरित केला होता. त्यानंतर कुटुंबातील वादही चर्चेत राहिले. त्यांच्या पश्चात मुलगा गौतम सिंघानिया यांच्यासह कुटुंबीय असा परिवार आहे. भारत सरकारने त्यांच्या उद्योग, समाजकार्य आणि साहसी कामगिरीतील योगदानाची दखल घेत २००६ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय वायुसेनेने त्यांना मानद ‘एअर कमोडोर’ पद बहाल केले होते. तसेच ते मुंबईचे ‘शेरिफ’ म्हणूनही कार्यरत होते.