५ एप्रिलला होणार चिखलीत पक्षप्रवेश सोहळा
बुलढाणा,
कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करून आपआपल्या सर्कल ,प्रभागातर्गत पक्षाची ताकद वाढवावी दि. ५ एप्रील रोजी चिखली येथे होणार्या शिवसेना पक्ष प्रवेश सोहळ्याचे योग्य नियोजन करावे अशा सुचना शिवसेनेचे नेते तथा केंद्रीयमंत्री Prataprao Jadhav प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पदाधिकार्यांना केली.
चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालयात तालुयातील शिवसेना पदाधिकार्यांची नियोजन बैठक दि. २९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख माया म्हस्के शिवसेना तालुका प्रमुख गजानन मोरे शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप माजी जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे न पा उपाध्यक्षा वैशाली खेडेकर शिवसेना शिक्षक सेनेचे वसंतराव गाडेकर उपस्थित होते
Prataprao Jadhav यावेळी बोलतांना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणले की अनेक पक्षतील पदाधिकारी सदस्य शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर विश्वास ठेवुन शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश करू इच्छितात . त्या सर्वांना सोबत घेऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवावी येणार्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी येत्या ५ एप्रिलला शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा योग्य नियोजन शिवसेनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले . केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे कोणत्याही मित्र दुखावेल अशा भाषेत टीका करू नका . मतभेद आणि मनभेद होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि आपला पक्ष वाढविण्यासाठी एक दिलाने , एकजुटीने काम करा अस आवाहन त्यांनी यावेळी केले . एक दोन महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पहिले स्वतःची ताकद वाढवावी आपल्या सर्कलमध्ये प्रभागांमध्ये पक्ष संघटन मजबूत करावं असा आवाहन त्यांनी यावेळी केलं ५ एप्रिलला चिखली येथे होणार्या पक्षप्रवेश सोहळ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात या बैठकीला शिवसेना , महिला आघाडी सेना युवा सेना किसन आघाडी सेनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.