नवी दिल्ली,
Mann Ki Baat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ११ वाजता ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातील नागरिकांशी संवाद साधला. हा कार्यक्रमाचा १३२ वा भाग असून २०२६ या वर्षातील तिसरा भाग आहे. ‘मन की बात’ कार्यक्रम हे लोकांशी थेट संवाद साधण्याचे व्यासपीठ मानले जाते.
पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात आधीच चालू असलेल्या ‘आईच्या नावाने एक झाड’ मोहिमेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, समाजाने पुढाकार घेतल्यास छोटे प्रयत्नसुद्धा मोठा बदल घडवू शकतात. Mann Ki Baat वाराणसी येथील अलीकडील उपक्रमाचा त्यांनी उल्लेख केला, जिथे एका तासात २,५१,००० हून अधिक झाडे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला गेला. मोदींनी हा यशस्वी उपक्रम लोकसहभागाचा उत्तम नमुना असल्याचे सांगितले. ‘आईच्या नावाने एक झाड’ मोहिमेत देशभरातील कोट्यवधी झाडे लावली जात आहेत, ज्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि हरित भारताच्या उद्दिष्टाला चालना मिळत आहे.
पंतप्रधानांनी जलसंधारणाबाबतही देशवासियांना जागरूक केले. उन्हाळा सुरू असल्यामुळे पाण्याचे संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, ‘जलसंचय अभियानांतर्गत’ गेल्या ११ वर्षांत देशभरात ५० लाख कृत्रिम जलसंधारण संरचना तयार करण्यात आल्या आहेत. तसेच, Mann Ki Baat ‘अमृत सरोवर’ मोहिमेत अंदाजे ७०,००० अमृत सरोवरे तयार करण्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी त्यांची स्वच्छता सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्रिपुराच्या जाम्पुई टेकड्यांतील वांगमुन गाव, छत्तीसगडमधील कोरिया जिल्हा आणि तेलंगणाच्या मंचरियाल जिल्ह्यातील मुधिगुंटा गावातील जलसंधारणाचे यशस्वी प्रयत्न पंतप्रधान मोदींनी उदाहरण म्हणून मांडले.
तंदुरुस्ती आणि आरोग्यावरही पंतप्रधानांनी भर दिला. साखरेचे सेवन कमी करण्याचे आणि स्वयंपाकातील तेल १० टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन त्यांनी देशवासियांना केले. तसेच, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग साधनेचा महत्त्वाचा संदेश त्यांनी पुन्हा एकदा दिला. Mann Ki Baat क्रिकेटच्या क्षेत्रातील यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. ७ दशकांनंतर रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचे कौतुक करत त्यांनी म्हटले की, यशस्वी कामगिरी तरुणांना खेळाकडे वळविण्याची प्रेरणा देईल आणि राज्यातील क्रीडा विकासाला चालना मिळेल.
पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांची शक्ती राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. ‘माय भारत’ संघटनेच्या माध्यमातून तरुणांना अर्थसंकल्पीय प्रक्रिया आणि धोरणनिर्मितीशी जोडून त्यांना सक्रिय भूमिका देण्याचे उद्दिष्ट साधले जात असल्याचे त्यांनी सांगितले. Mann Ki Baat त्यांनी काही तरुणांच्या मतेही ऐकली ज्यामध्ये कृषी, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि ग्रामीण क्रीडा विकासावर भर होता. हस्तलिखितांचा संग्रह करण्यासाठी सुरू केलेल्या ‘ज्ञान भारतम सर्वेक्षण’ उपक्रमाचा पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. देशभरातील विविध लिप्यांमधील हस्तलिखिते ‘ज्ञान भारतम’ ॲपवर शेअर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जागतिक पेट्रोल व डिझेल संकटाबाबतही पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आणि देशवासियांना एकजूट राहून या आव्हानांचा सामना करण्याचे आवाहन केले. Mann Ki Baat तसेच, शेजारी देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत बोलत ते म्हणाले की, अफवा पसरवण्याचे राजकारण टाळावे आणि सातत्याने दिलेल्या अधिकृत माहितीस विश्वास ठेवावा.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाने नागरिकांना पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, तंदुरुस्ती आणि राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे संदेश दिले. तसेच, देशभरातील तरुणांना सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे प्रेरणादायक आवाहन या कार्यक्रमातून केले गेले.