पुलगाव.
Pulgaon.: Railway accident averted माझरी येथून भुसावळ कडे जाणाऱ्या कोळसा रेल्वे गाडीला अचानक लागलेल्या आगीमुळे होऊ घातलेली मोठी दुर्घटना रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे टळली. याप्रसंगी केंद्रीय दारू गोळा भांडाराच्या अग्निशमन दलाने महत्वपूर्ण भूमिका बजावत आगीला नियंत्रणात आणले. यावेळी नगरपरिषद पुलगावचे अग्निशमन दलही पोचले होते.
Pulgaon.: Railway accident averted पुलगाव रेल्वे स्टेशनचे सहाय्यक प्रबंधक अनुपकुमार जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार एम एफ एस जी मांजरी भुसावळ ही कोळसा घेऊन जाणारी रेल्वे गाडी पुलगाव जवळून जात असताना त्यातील डबा क्रमांक आठ व अठराला आग लागल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले. वर्धा येथील रेल्वे अधिकाऱ्यांनी पुलगाव रेल्वे स्टेशनला याबद्दल माहिती दिली. दुपारी १-५५ ला ही गाडी पुलगाव येथे पोहोचताच थांबविण्यात आली. केंद्रीय दारुगोळा भंडार व नगरपरिषदेच्या अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत आग लागलेल्या डब्यांची आग विझवली . सदर डब्यांना गाडीपासून विलग करण्यात आले. आज पूर्णपणे विझल्याची खात्री करून सदर डबे मुख्य गाडीला जोडण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही गाडी पुढे रवाना करण्यात येईल. रेल्वे प्रशासन व अग्निशामक दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे पुलगावात होऊ घातलेला एक मोठा अपघात टळू शकला.