राज्यस्तरीय शंकरपटात ‘शिवा-बजरंग’चा विजयी झंकार

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
लाखाच्या बक्षिसावर नाव कोरले
 
सेलू, 
Shankarpat competition: 'Shiva-Bajrang' wins साहसिक जनशती संघटना व मित्रपरिवाराच्या संयुत वतीने बालू सोनटके यांच्या शेतात आयोजित राज्यस्तरीय शंकरपट स्पर्धेत १३५० फूट जोडदाणीच्या बैलगाडा शर्यतीने प्रेक्षकांचा अक्षरशः श्वास रोखून धरला. थरार, वेग आणि अचूकतेच्या या स्पर्धेत यवतमाळ येथील नीतू तिवारी यांच्या ‘शिवा-बजरंग’ बैलजोडीने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे मानाचे पारितोषिक जिंकले.
 
 
shiva
 
आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बैलजोडी मालक नीतू तिवारी व धुरकरी संजय जाधव यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला साहसिक जनशती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार, वर्धेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नगरसेवक किशोर दिघे, अंकुश ठाकूर, सुरेश चव्हाण, नितेश कराळे, आयोजन समितीचे अध्यक्ष भूषण उर्फ बंटी वाघमारे, बंडू पाटील डफरे, बालू सोनटके, दामू पोहाणे, अ‍ॅड. अमोल कोटंबकार, सुनील बुरांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 
 
 
Shankarpat competition: 'Shiva-Bajrang' wins  या स्पर्धेत द्वितीय क्रमांक ढाणकी येथील ‘मोत्या-कोहिनूर’, तृतीय व चतुर्थ नागपूरच्या ‘बादल-मोटू’ व ‘नीलम-बंडोल’ यांनी पटकावले. पुढील क्रमांकांमध्ये ‘डॉलर-मुंडराई’, ‘राजू-लालू’, ‘लालू-सोन्या’, ‘शेरू-सभापती’ आदी बैलजोड्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष ‘छकडा’ पुरस्कार ‘शंकर-माऊली’ या बैलजोडीला प्रदान करण्यात आला. स्पर्धेत अचूक वेळ नोंदवण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल घड्याळाचा वापर करण्यात आला. समालोचन संतोष डाखोळे गुरुजी, सचिन धानकुटे व सागर राऊत यांनी रंगत आणली, तर सिग्नल व झेंडी व्यवस्थापनही उत्कृष्ट पार पडले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिलीप गावंडे, मंगेश रामटेके, जगदीश रोकडे, अरुण कोटंबकार, प्रकाश कोटंबकार, सतीश वांदिले, आशिष धापूडकर, प्रकाश बडेरे, बंटी सोमनाथे, बाळा टालाटुले, पवन रहांगडाले, कलीम शेख, कुणाल पचारे, अरविंद तुमडाम, रवींद्र दूरतकर, अंकित वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. थरारक धावा, जल्लोषाने दुमदुमलेले मैदान आणि बैलजोड्यांचा विक्रमी वेग यामुळे हा राज्यस्तरीय शंकरपट रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला.