बुलडाणा,
Shri Ram Janmotsav संपूर्ण जगात सध्या जे युद्धाचे व अस्थिरतेचे सावट आहे, त्यामुळे संपूर्ण मानव समाज होरपळून निघत असल्याने जगाच्या विश्र्वशांती साठी श्री रामाच्या चरणी प्रार्थना केली येथील पेठेतील श्रीराम मारुती मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. बुलडाणा शहराचे अध्यात्मिक वैभव असलेल्या श्रीराम मारुती मंदिर परिसरात सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
राम जन्मला ग सखे, राम जन्मला या पारंपारिक गजराने आणि श्रीराम जय राम जय जय राम च्या गजराने मंदिर परिसर अक्षरशः दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले.गुढीपाडवा ते श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने श्रीराम रायास अभिषेक,मातृवर्गाची भजनसेवा, दैनिक व साप्ताहिक उपासना तसेच श्री क्षेत्र औदुंबर येथील वरदबुवा जोशी, शरद गुरव, तसेच राष्ट्रीय किर्तनकार श्री चारुदत्त आफळे यांचे किर्तन असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ११५ वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या पेठेतील श्रीराम मारुती मंदिरात भाविकांनी जयश्री राम च्या घोषणांनी एकच गर्दी केली होती.
Shri Ram Janmotsav गुरुवार दि २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता श्री वरदबुवा जोशी यांचे गुलालाचे किर्तन सुरू झाले,व राम जन्माचा भावपुर्ण सोहळा १२ वाजता साजरा करण्यात आला. यावेळी श्रीराम मारुती मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ प्रमोद देशपांडे, बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक,उपाध्यक्ष मधुसूदन कुलकर्णी, अनंता देशपांडे,यांच्या हस्ते श्री रामाची आरती करण्यात आली. यावेळी बोलतांना संस्थानचे अध्यक्ष डॉ प्रमोद देशपांडे यांनी संस्थानची ११५ वर्षाची गौरवशाली परंपरा विषद केली.दि २७ शुक्रवार सायंकाळी ७ वाजता हभप चारुदत्त आफळे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून विश्वधर्म ही संकल्पना आजच्या अस्थिर, संघर्षमय जगात अधिकच सुसंगत वाटते जात, धर्म, लिंग या भेदांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना स्विकारणं हिच खरी साधना आहे,असे म्हणत उपस्थित भाविकांच्या अंत:करणाला स्पर्श केला.यावेळी संस्थानचे विश्वस्त संजय कुलकर्णी, रामानंद कविश्वर, आशुतोष वाईकर, मोहन मामा कुलकर्णी,सुयोग अन्वेकर, प्रदिप कविमंडन, नितीन भालेराव,दादा भालेराव, पुजारी मंगेश सलफळे, धनंजय महाजन,विजय व्यवहारे, तसेच वैजयंती कस्तुरे, संध्या महाजन, वसुधा शास्त्री, माधुरी कुलकर्णी, नलिनी वरणगावकर, कल्पना भालेराव, या महिलांनी मोलाचे सहकार्य केले.