शेगांव मधे श्रीराम शोभायात्रांची धुम

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
नंदु कुळकर्णी
शेगांव ,
Shri Ram Shobhayatra शेगांव मधे श्रीराम नवमी निमित्त श्रीराम शोभायात्रांची धूम पाहायला मिळाली शेगाव हे संत गजानन महाराजांचे संत नगरी असल्यामुळे व श्रीराम नवमीला लाखो भक्त संत गजानन महाराजांच्या दर्शनाला येत असल्यामुळे तिसऱ्या दिवशी रामनवमीची शोभायात्रा शेगाव मध्ये काढण्यात येते.
 

ram 
 
Shri Ram Shobhayatra विश्व हिंदू परिषद बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सकल हिंदू समाज सहभागी होऊन या शोभायात्रा काढण्यात येतात काल विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने अध्यक्ष विजय यादव व ज्ञानेश्वर साखरे यांच्या नेतृत्वाखाली एक शोभायात्रा काढण्यात आली तसेच हेमंत पिल्ले व एडवोकेट प्रकाश कलतारी यांच्या नेतृत्वाखाली दुसरी एक शोभायात्रा काढण्यात आली दोन्ही यात्रा या अतिशय आकर्षक व लक्षवेधी ठरल्या पिल्ले पकडता रे यांच्या नेतृत्वातील शोभायात्रा ही दिंडी स्वरूपात काढण्यात आली व हरिनामाचा श्रीरामाचा गजानन महाराजांचा जयघोष करत अत्यंत सुमधुर आवाजात भजन म्हणत भक्तीगीते होणार टाळ मृदुंगाच्या व पावली च्या तालावरती ही शोभायात्रा काढण्यात आली यावेळेस महिलांचा मोठा सहभाग या यात्रेमध्ये दिसला तसेच दोन भगिनी घोड्यावरती स्वार होऊन अतिशय रुबाबदारपणे या शोभायात्रा मध्ये सहभागी झाल्या होत्या वही शोभायात्रा अतिशय शिस्तीने मंदिर परिसरातून निघून संपूर्ण गावात ठरल्याच्याप्रमाणे निघून संत गजानन महाराजांच्या मंदिरात स्वागत स्वीकारून समाप्त करण्यात आली तसेच दुसरी शोभायात्रा यादव आणि साखरे यांच्या नेतृत्वाखाली अग्रसेन चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक या मार्गाने मंदिर परिसरामध्ये केली यावेळेस खास खानदेशी स्टाईलचा डीजे आणण्यात आला होता यावर यावर हजारो तरुणाई फिरताना दिसली तसेच आदिवासी नृत्य अतिशय आकर्षक पद्धतीने साजरी सादर करण्यात आले तसेच कराटे व दंड याची प्रात्यक्षिक भगिनींच्या वतीने सादर करण्यात आले व तो एक आकर्षणाचा विषय ठरला तसेच श्रीराम व नृसिंह व अफजलखानाचा वध अशा देखाव्यांनी ही यात्रा प्रचंड गाजली या यात्रेला पाहण्यासाठी हजारो लोकांनी मेन रोड शेगाव येथे प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे रेल्वे स्टेशन ते मंदिर या रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी सुद्धा झाली परंतु अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ह्या दोन्ही यात्रा आपले मार्गक्रमण करत राहिले या दोन्ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आल्या व अतिशय भक्तिभावाने एकमेकांच्या यात्रांचे स्वागत व अभिवादन करून यात्रा पुढे आपापल्या मार्गाने मार्गक्रमण झाल्या यामुळे शेगाव मध्ये श्रीराम नामाचा गजर झाला व शेगाव भक्तिमय व भगवे मे होऊन गेले होते रात्री दहा वाजता ह्या दोन्ही यात्रांचा समारोप श्रीरामाची महाआरती करून झाली व जय श्रीराम च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता छायाचित्र श्रीराम श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करताना