मंदिराची छत कोसळली : भविकाचा मृत्यू

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
तिरुचिरापल्ली
Tiruchirappalli temple तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील समायपुरम मरियम्मन मंदिरात दुर्दैवी घटनेत एक भाविक ठार झाला आणि दोन जण जखमी झाले आहेत. घटना सन्नाथी स्ट्रीट मंडपममध्ये घडली जिथे दर्शनासाठी आलेले भाविक झोपलेले होते. मंदिराची छत अचानक कोसळल्याने हा अपघात घडला.
 

Tiruchirappalli temple roof collapse, Samayapuram Mariamman Temple accident 
त्रिची जिल्हा पोलिसांनी सांगितले की, तंजावुर जिल्ह्यातील ३२ वर्षीय नादिया या तरुणीला घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, इतर दोन जखमींना तातडीने महात्मा गांधी मेमोरियल सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याआधी तंजौर Tiruchirappalli temple जिल्ह्यातही मंदिर उत्सवादरम्यान दुर्दैवी घटना घडली होती. तिरुवैयारूजवळ एका मंदिर उत्सवात १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलगी ५ वीच्या वर्गात शिकत होती आणि मंदिरात जाण्यासाठी एका मालवाहक ऑटोमध्ये बसलेली होती. ऑटोमध्ये चालू असलेल्या जनरेटर इंजिनजवळ तिचे केस अडकले, ज्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या. तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले गेले, परंतु तिला  वाचवता आले नाहीत.या दोन्ही घटनांनी मंदिरातील संरचना आणि सुरक्षा याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.