अनिल कांबळे
नागपूर,
Vindhyeshwari suicide विंध्येश्वरी आणि माधव (काल्पनिक नाव) या दाेघांचे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर जीवपाड प्रेम. दाेघांच्याही कुटुंबियांचा प्रेमाला विराेध. दाेघांनीही प्रेमविवाह करण्याचे ठरविले. विंध्येश्वरी नर्सिंगच्या अंतिम वर्षाला असल्यामुळे दिवाळीत दाेघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अचानक प्रियकराने कुटुंबियांच्या दबावात नातेवाईक मुलीशी लग्न ठरविले. दाेघांमध्ये बराच वाद आणि रुसवे, ुगवे झाले. मात्र, लग्न करण्यासाठी कुटुंबियांचा दबाव असल्याने माधवने लग्न केले. प्रियकराच्या लग्नाच्या दुसèयाच दिवशी विंध्येश्वरीने त्याला व्हिडिओ काॅल करुन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची वाशिम जिल्ह्यातील असलेली विंध्येश्वरी आईवडिलांची एकुलती मुलगी. ती बारावीत असतानाच तिचे माधव नावाच्या युवकाशी सूत जुळले. दाेघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबियांया दाेघांच्याही संबंधाला विराेध हाेता. त्यामुळे दाेघांनी कुटुंबियांच्या विराेधात जाऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दाेन वर्षांपूर्वी तिने नागपुरातील हिंगणा परिसरात असलेल्या एका नर्सिंग काॅलेजला प्रवेश घेतला. ती अंतिम वर्षाला शिकत हाेती. निकाल लागताच ती नाेकरीनंतर माधवशी प्रेमविवाह करणार हाेती. ती नागपुरात एका फफ्लॅटमध्ये अन्य दाेन वर्गमैत्रिंणींसह राहत हाेती. शनिवारी दाेन्ही मैत्रिणी पदवीदान समारंभासाठी बाहेर गेल्या हाेत्या. त्या वेळी विंध्येश्वरी फफ्लॅटमध्ये एकटीच हाेती. तीन घरात गळास घेऊन आत्महत्या करीत जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी हिंगणा पाेलिसांनी तुर्तास आत्महत्या केल्याची नाेंद केली.
प्रियकराला व्हिडिओ काॅल
माधवचे लग्न ठरताच Vindhyeshwari suicide विंध्येश्वरी नैराश्यात गेली हाेती. ती तणावात राहायला लागली. याचे दुःख तिने मैत्रिणीकडे बाेलून दाखवले हाेते. माधवचे लग्नाची तारीख जवळ येताच ती खूप रडत हाेती. गेल्या दाेनच दिवसांपूर्वीच माधवचे दुसèया युवतीशी लग्न झाले. त्यामुळे तिच्या मनावरील ताबा सुटला. माधवने कुटुंबियांसमाेर हतबल हाेऊन लग्न केल्याचे सांगितले. मात्र, तिने जगण्याची आशा साेडून दिली हाेती. तिने माधवला व्हिडिओ काॅल केला. त्याच्यासमाेरच फफ्लॅटमध्ये गळास घेऊन आत्महत्या केली.