नागपूर,
women in film industry India चित्रपटसृष्टीतील विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे वाढते योगदान आणि त्यांचा संघर्षमय प्रवास अधोरेखित करणारे विशेष चर्चासत्र नागपूर चित्रपट महोत्सवात उत्साहात पार पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि नागपूर चित्रपट प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सत्राला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या चर्चासत्रात डॉक्युमेंटरी फिल्ममेकर अनुराधा सिंह, फिल्म निर्माती व लेखिका निधी सिंह धर्मा, पटकथा व संवाद लेखिका मनीषा कोरडे आणि कला दिग्दर्शक स्निग्धा कर्महे यांनी आपले अनुभव मांडले. मुलाखतकार सुष्मिता सिंह यांनी विविध क्षेत्रांतील प्रश्नांद्वारे चर्चेला अधिक परिमाण दिले.निधी सिंह धर्मा यांनी मिशन मंगल चित्रपटाच्या उदाहरणातून पात्रनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करताना, एका पात्रासाठी सखोल लेखन आणि विविध पैलूंचा विचार आवश्यक असल्याचे सांगितले. महिलांना या क्षेत्रात संघर्ष करावा लागतो, मात्र त्यातूनच अनुभव आणि संधी निर्माण होतात, असे त्यांनी नमूद केले.स्निग्धा कर्महे यांनी अभियांत्रिकी शिक्षणानंतर फॅशन डिझाइनच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश करत संघर्षातून आपले स्थान निर्माण केल्याचा प्रवास मांडला. अनुराधा सिंह यांनी एडिटिंग क्षेत्रातील बारकावे सांगताना, एकच फुटेज अनेकदा तपासावे लागते आणि संगीत-संवाद यावर विशेष लक्ष द्यावे लागते, असे स्पष्ट केले.
मनीषा कोरडे यांनी सर्जनशीलता women in film industry India असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते, असा विश्वास व्यक्त केला. तज्ञांनी महिलांना कमी लेखू नये, त्यांच्या योगदानाची दखल घ्यावी, असे आवाहन केले.दरम्यान, ‘जाहिरात ही एक कला’ या विषयावर साजन राज कुरुप यांचे विशेष सत्र झाले. चित्रपटाच्या यशासाठी प्रभावी जाहिरात आणि मार्केटिंग महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले