वॉर्सा,
12 tons of Kit Kat Truck stolen युरोपमध्ये झालेल्या एका विचित्र चोरीने सध्या संपूर्ण जगाचा लक्ष वेधून घेतले आहे. सामान्यपणे सोनं, हिरे किंवा ऐतिहासिक वस्तू चोरी होणे सामान्य आहे. पण अलीकडे काही अज्ञात व्यक्तींनी चक्क १२ टन किटकॅट चॉकलेट बार्ससह ट्रक चोरल्याची घटना घडली. सदर घटना मध्य इटलीतील घडली. माहितीनुसार येथे एका कारखान्यातून पोलंडकडे नेल्या जाणाऱ्या ट्रकमध्ये १२ टन किटकॅट चॉकलेट बार्स गायब झाले. किटकॅटने याबाबत अधिकृतपणे खुलासा केला आहे. या ट्रकमध्ये नवीन चॉकलेट रेंजच्या ४१३,७९३ युनिट्स होत्या.
किटकॅटच्या मूळ कंपनीने या घटनेची पुष्टी केली असून स्थानिक अधिकाऱ्यांच्या आणि पुरवठा साखळीतील भागीदारांच्या मदतीने चौकशी सुरु असल्याचे सांगितले. ट्रक इटलीहून पोलंडकडे जात असताना चोरी झाली. सर्व ट्रकसहित चॉकलेट्स चोरांनी उचलून नेल्या. कंपनीने ही घटना सार्वजनिक केली जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. किटकॅटने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर देखील या घटनेची पुष्टी केली आणि चौकशी सुरु असल्याचे सांगितले. कंपनीने स्पष्ट केले की याचा पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. मात्र या विचित्र चोरीची सर्वत्र चर्चा होत आहे.