खापरखेडा हद्दीतून चार गुन्हेगार हद्दपार

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Criminals deported प्राणघातक हल्ले, माेक्याच्या ठिकाणी असलेल्या स्थावर मालमत्तांवर अतिक्रमणे, शस्त्राच्या धाकावर खंडणी वसुली सारख्या गंभीर गुन्ह्यांमधून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाèया चार सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्याच्या परिघातून पाेलिसांनी हद्दपार केले.
 
 
hadpar
 
Criminals deported  देवधन रज्जूराव तेलंगे (32, रा. इंदिरानगर आबादी), रितीक सुरेश दुपारे (26), पवन उफर् बाेडी नरेश नेवारे (30, रा. कुचक माेहल्ला पिपळा डाकबंगला) आणि माेहम्मद सलमान अनवर अली सलमानी (24, रा. वलनी) अशी पाेलिसांनी हद्दपार केलेल्या चार सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या चाैघांविराेधात यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. वारंवार समज देऊनही त्यांच्या वागणूक कसलीही सुधारणा हाेत नव्हती. त्यात ग्रामीण पाेलिस हद्दीतील खापरखेडा पाेलीस ठाणे शहर पाेलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सामावून घेतल्यापासून गुन्हेगारीचा बिमाेड करण्यासाठी ठाणेदार रुमकर यांनी चाैघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाेलिस उपायुक्त डाॅ. संदीप पखाले यांच्याकडे पाठवला हाेता. त्याचे अवलाेकन करून पाेलिस उपायुक्त डाॅ. पखाले यांनी पुढील 6 महिन्यांसाठी या चारही गुंडांना शहर आणि ग्रामीण परिघातून हद्दपार करत राज्याबाहेरील नातेवाईकांच्या घरी नेऊन साेडताना शहरात प्रवेश न करण्याची ताकिद दिली.