टाईप-2 मधुमेहींचे यकृत निकामी होण्याचा धोका मोठा असतो. भारतात झालेल्या सर्वात मोठ्या ’दी डाय-फिब-लिव्हर स्टडी’ अभ्यासातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. नागपूर शहरातून मिळालेल्या माहितीचा या अभ्यासात मोठा वाटा असून, हे संशोधन वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य ‘द लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहे. प्रख्यात मुधमेह तज्ज्ञ Dr. Sunil Gupta डॉ. सुनील गुप्ता व त्यांच्या चमूने या संशोधनासाठी दिलेल्या योगदानामुळे स्थानिक स्तरावरील मधुमेहींची नेमकी स्थिती जागतिक पटलावर आली आहे. त्यांनी सांगितले की, जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान भारतातील विविध केंद्रांवर 9,202 प्रौढ मधुमेही रुग्णांच्या ‘व्हायब्रेशन कंट्रोल ट्रान्झिएंट इलास्टोग्राफी’द्वारे यकृताच्या कडकपणाची पातळी मोजून हा निष्कर्ष काढण्यात आला.
Dr. Sunil Gupta मधुमेहग्रस्त 4 पैकी एकात (26 टक्के) यकृताचा गंभीर आजार आढळला. दर 7 पैकी एका रुग्णामध्ये (14 टक्के) आजार प्रगत अवस्थेत पोहोचला होता. दर 20 पैकी 1 रुग्ण (5 टक्के) असा आहे, ज्याचे यकृत निकामी होण्याच्या उंबरठ्यावर होते, परंतु अद्याप निदान झाले नव्हते. लठ्ठच नाही, तर ‘बीएमआय’ 25 पेक्षा कमी आहे अशा 19 टक्के ‘लठ्ठ नसलेल्या (नॉन-ओबेस) व्यक्तीत यकृताचा आजार दिसला. दक्षिण भारतात हा धोका सर्वाधिक 30 टक्के तर मध्य भारतात 21 टक्के आढळला. ‘स्टीटोसिस’ किंवा यकृतावरील चरबी. साधारणपणे यकृतावर चरबी असेल तरच धोका मानला जातो. यकृतावर चरबी नसलेल्या 13 टक्के रुग्णांना गंभीर फायब्रोसिस होता, असे या अभ्यासात असे दिसून आले. हे सध्याच्या केवळ फेटी लिव्हर तपासण्याच्या पद्धतीला मोठे आव्हान ठरले आहे.