शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग; लाखोंचे नुकसान

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
सेलू, 
fire-in-cowshed : तालुक्यातील सेलडोह येथे शेतातील गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत शेती साहित्य, वैरण व इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत शेतकर्‍याचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
 

JK 
 
मिळालेल्या माहितीनुसार, २८ रोजी दुपारच्या सुमारास हिरालाल मणिराम आवाते यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. गोठ्यात ठेवलेले सुमारे ५० पाईप, २३ बंडी कुटार तसेच शेतीसाठी लागणारे अवजार जळून खाक झाले. आग लागण्यामागे शॉर्टसर्किटचा अंदाज व्यत केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू व सिंदी येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. तलाठी दीपक नाईक तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.