अनिल कांबळे
नागपूर,
Ganja smuggler arrested शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गांजा तस्करी आणि विक्री करणाèया एका महिलेला गुन्हे शाखा पाेलिसांंनी अटक केली. सलाेनी रणवीरसिंग चाैधरी (20) असे आराेपी महिलेचे नाव आहे. 28 मार्चच्या रात्री दुचाकीने गांजाची तस्करी करणाèया तेजप्रताप शाहू (30) रा. वाजपेयीनगर, कळमना यास पाेलिसांनी अटक केली हाेती.
Ganja smuggler arrested त्याच्या ताब्यातून पाेलिसांनी 24 हजार 25 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हाेता. प्रेमनगर येथील सलाेनी चाैधरी हिच्याजवळून गांजा खरेदी केल्याची कबुली शाहूने पाेलिसांना दिली हाेती. त्यावरून पाेलिसांनी सलाेनीचा शाेध सुरू केला हाेता. मात्र, शाहूला अटक झाल्याचे तिला समजताच ती पसार झाली. पाेलिसांनी तिच्या माेबाईलचे लाेकेशन काढून तिचा शाेध सुरू केला हाेता. अखेर शांतीनगर येथून पाेलिसांनी तिला आपल्या जाळ्यात ओढले. तिची विचारपूस केली असता ारूख नावाचा तस्कर तिला गांजा पुरवित असल्याचे तिने सांगितले. पुढील कारवाईसाठी तिला कळमना पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पाेलिस उपायुक्त राहुल माकणीवर यांच्या पथकाने केली.