नवी दिल्ली,
shabbir ahmed lone arrested सुरक्षा यंत्रणांनी लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोनला दिल्ली सीमेवरून यशस्वीरित्या अटक केली आहे. लोन हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून बांगलादेशमधून लश्करचे एक नवीन मॉड्यूल तयार करत होता.
दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला राजधानीच्या सीमेवर पकडले. तपासात असे उघड झाले की, तो सीमेपलीकडून मिळालेल्या सूचनांनुसार भारतविरोधी कारवाया करण्याच्या मोहिमेवर होता. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात त्याचे आणखी किती साथीदार लपले आहेत, हे शोधण्यासाठी तपास यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.
भारतविरोधी पोस्टर्स लावण्यात आले होते.
अलीकडेच दिल्ली आणि दक्षिण भारतात लश्करची मॉड्यूल उघडकीस आली होती.shabbir ahmed lone arrested या मॉड्यूलने दिल्ली आणि कोलकाता येथील विविध ठिकाणी भारतविरोधी पोस्टर्स लावले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष आणि केंद्रीय यंत्रणांनी मोठे यश मिळवले आहे.