मंदार बाहेकर बुलढाणा विधानसभा प्रमुख म्हणून निवड

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
बुलढाणा,
mandar-bekhker : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या एस आय आर अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत बुलढाणा विधानसभा क्षेत्रासाठी मंदार भास्करराव बाहेकर यांची बि. एल. ए. १ विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
J
 
 
 
ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
मंदार बाहेकर हे भाजप शहर अध्यक्ष, भाजप शहर, युवा व किसान मोर्चामध्ये सरचिटणीस पदावर कार्य करत त्यांनी संघटन विस्तारात मोलाची भूमिका बजावली आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या मंदार बाहेकर यांनी गोवा विधानसभा निवडणूक, बूथ बळकटीकरण मोहीम तसेच विविध विस्तार योजनांमध्ये आघाडीवर राहून काम केले आहे. विधानसभा प्रमुख म्हणून मंदार बाहेकर यांच्याकडून मतदार यादी पुनर्निरीक्षण, बूथ स्तरावर भक्कम संघटन उभारणे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.