वैष्णवी कॉन्व्हेंटमध्ये भीषण आग

वेळीच मदत मिळिल्याने मोठा अनर्थ टळला

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
साकोली,
Massive fire breaks out in Vaishnavi Convent सेंदुरवाफा शहरातील प्रगती काॅलनीतील वैष्णवी कॉन्व्हेंट येथे फ्रिज मध्ये स्पार्किंग होऊन आग लागली. वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. कुठल्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. आज 30 मार्च रोजी दुपारी साधारण 12 वाजताच्या सुमारास घटना घडली. हे काॅंन्हेट दिपक रामटेके यांच्या बिल्डिंग मध्ये आहे. फ्रीजमध्ये झालेल्या स्पार्कमुळे आग लागली आणि क्षणार्धात धुराचे लोट पसरू लागले. परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटना घडताच परिस्थिती गंभीर बनली होती.
 
 

jains 
 
मात्र, संकटाच्या या क्षणी सामाजिक बांधिलकी जपत प्रगती काॅलनीतील नगरसेवक संदीप बावनकुळे यांनी तात्काळ नगर परिषद अग्निशामक दल, पोलीस स्टेशन तसेच इलेक्ट्रिक विभागाला कळविले. प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे काही मिनिटातच घटनास्थळी यंत्रणा दाखल झाली. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर कैलास मेंढे व रोहित ऊके यांनी घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.