अनेक वस्त्यांमध्ये डासांचा प्रकोप

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
डासांचे थवेच्या- थवे तुटून पडतात
डासांमुळे मलेरिया आणि डेंग्यूचा धोका

नागपूर,
Mosquito outbreak वातावरणातील बदलामुळे नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये डासांचा प्रकोप वाढला आहे. विशेषत: नागनदीच्या काठावरील वस्त्यांमध्ये डासांचा धुमाकूळ दिसून येत आहे. सायंकाळनंतर डासांचे थवेच्या- थवे तुटून पडत आहे. वाढत्या डासांमुळे मलेरिया आणि डेंग्यूचा धोका होण्याची शक्यता असल्याने मनपा प्रशासनाने याकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची त्रस्त नागरिकांनी केली आहे.
 
nag-river
 
डासांमुळे झाली रात्रीची झोपमोड
अंबाझरी तलावापासून नागनदीचा प्रवाह सुरु होता.अंबाझरी वस्ती, डागा लेआउट, हिलटॉप, शिवाजीनगर, रामनगर, गोकुळपेठ, धरमपेठ, सीताबर्डी, धंतोली, ग्रेटनागरोड, अशोक चौक, महाल, तुळशीबाग, रेशिमबाग, आझमशहा लेआउट, राजेंद्रनगर, दर्शन कॉलणी, नंदनवन घरकुल योजना वस्ती आदी अनेक वस्त्यांमध्ये डासांचा प्रकोप वाढला आहे. घरोघरी डासांची संख्या रात्रीची झोपमोड होत आहे. वाढत्या डासांमुळे घरात सुरक्षितरित्या कसे राहावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने डासांचे निर्मूलन करण्यासाठी तातडीने पाउल उचलावे.
 
उपाययोजना करण्याची मागणी
Mosquito outbreak  एकीकडे कडक उष्णतामान असताना सायंकाळनंतर डासांचा त्रास वाढतो. मच्छरदाणी लावल्यानंतर सुध्दा डासांचा त्रास सहण करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यापूर्वीच्या सर्वेक्षणात हजारांहून अधिक घरांमध्ये डासांची उत्पत्ती आढळली होती. यात प्रामुख्याने साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली असून प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. डासांची पैदास होणार नाही याकडे आता नागरिकांना सुध्दा अधिक लक्ष देण्याची गरज आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी स्वतःच्या घराभोवती पाणी साचू देऊ नये, जेणेकरून डासांची पैदास होणार नाही. कुलर, बादल्या, टायर आणि टाक्यांमधील पाणी वेळोवेळी बदलण्याची गरज असते. तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर केल्यास डासांपासून होणारे आजार पसरण्याची धोका कमी होईल, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.