तिसऱ्यांदा ओढविले खासदारांवर आरिष्ट...

खा. प्रशांत पडोळेंच्या वाहनाला पुन्हा अपघात, खासदार बचावले

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
भंडारा,
mp prashant padoles खासदार झाल्यापासून संकटाच्या प्रसंगांना तोंड देणाऱ्या भंडारा गोंदियाचे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्यावर आज पुन्हा एक आरिष्ट ओढविले. अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्यास निघालेल्या खासदारांच्या वाहनाला भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. खासदार थोडक्यात बचावले असले तरी त्यांच्या वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. यापूर्वीही दोन जीवावर भेटणाऱ्या घटनांमधून ते सुखरूप निघाले होते.
 

mp prashant padoles 
 
 
खा. डॉ. प्रशांत पडोळे आज 30 रोजी सकाळी ६.४९ वाजता भंडारा येथून नागपूरच्या दिशेने निघाले. दिल्ली येथे अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथून रवाना होणार होते. दरम्यान भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गांवर नागपूर जवळील हल्दीराम कंपनी समोर त्यांच्या फॉर्च्यूनर गाडीला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने डॉ. पडोळे आणि त्यांच्या सोबतचे सहकारी सुरक्षित आहे. अपघाताची माहिती होताच कार्यकर्ते व पोलीस घटनास्थळी पोहचले. खासदार सुखरूप असल्याचे पाहून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. अपघातानंतर दुसऱ्या वाहनाने खासदार नागपूरला पोहचून दिल्लीसाठी रवाना झाले.
 
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून एकामागून एक धक्कादायक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.mp prashant padoles विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी, २६ मार्च २०२६ रोजी भंडाऱ्यातील शासकीय विश्रामगृहात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. या घटनेच्या वेळी खा. पडोळे तेथे उपस्थित होते आणि ते थोडक्यात बचावले. त्यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
 
यापूर्वीही काँग्रेस खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीला ११ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला होता. दिल्लीहून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करून परतत असताना त्यांच्या फॉर्च्यूनर MH 36 AP 9911 क्रमांकाच्या गाडीचा अपघात झाला होता. ज्यात ते किरकोळ जखमी झाले होते. थोडक्यात बचावले होते.
खासदार झाल्यापासूम घडणाऱ्या घटना पाहता तिसऱ्यांदा त्यांच्यावर आरिष्ट ओढविले असून यामुळे कार्यकर्ते चिंताग्रस्त झाले आहेत.