राष्ट्रभाषा प्रचार समितीने जगभरात हिंदीची ज्योत प्रज्वलित केली : कुलगुरू शर्मा

*राष्ट्रभाषा प्रचार समितीचा दीक्षांत सोहळा थाटात

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
Kumud Sharma : येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीने देशातच नव्हे तर संपूर्ण जगभर हिंदी भाषेच्या प्रसार-प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. समितीने हिंदीची ज्योत जगभर प्रज्वलित केली आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. कुमूद शर्मा यांनी केले.
 

J 
 
 
 
राष्ट्रभाषा प्रचार समितीचा ३५ वा दीक्षांत समारंभ रविवार २९ रोजी समितीच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे अध्यक्ष सूर्य प्रसाद दीक्षित तर समितीचे प्रधानमंत्री डॉ. हेमचंद्र वैद्य, समितीचे पदाधिकारी डॉ. महेश अग्रवाल यांची मंचावर उपस्थिती होती.
 
 
कुलगुरू प्रा. शर्मा पुढे म्हणाल्या की, समितीचे कार्य हिंदीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला बळकटी देत आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासूनच समितीने हिंदीला जन-जनांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. हिंदी ही आपल्या सांस्कृतिक ओळखीचा आधार असून ती आपल्या परंपरा, संस्कृती आणि सभ्यतेची भाषा आहे, असेही त्या म्हणाल्या. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात हिंदीचे महत्त्व अधिक वाढले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत भारतीय भाषांना योग्य स्थान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे हिंदीसह इतर भारतीय भाषांना नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यत केला. जगातील प्रमुख भाषांमध्ये हिंदीचे स्थान सातत्याने अधिक भकम होत आहे. ही गौरवास्पद बाब आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
 
 
वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या स्थापनेमागे राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मोठे योगदान आहे. सन १९७५ मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या विश्व हिंदी संमेलनाचे आयोजन समितीच्या नेतृत्त्वाखाली झाले होते आणि त्यातच हिंदी विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या दृष्टीने विद्यापीठ आणि राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचे परस्परांशी घट्ट नाते आहे, असेही त्या म्हणाल्या.
 
 
यावेळी स्वागतपर भाषण समितीचे प्रधानमंत्री डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी केले, तर समितीचे पदाधिकारी डॉ. महेश अग्रवाल यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी समितीला आर्थिक सहकार्यही प्राप्त झाले असून दानशूर व्यतींनी आर्थिक मदत व इतर स्वरूपात सहकार्य केले.
 
 
दीक्षांत समारंभाच्या शेवटी प्रा. डॉ. कुमूद शर्मा यांनी दीक्षार्थींना शपथ देऊन त्यांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले. या समारंभास राष्ट्रभाषा प्रचार समितीचे विविध राज्यांतील पदाधिकारी, हिंदी प्रेमी तसेच वर्धा येथील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.