नागपूर,
panchmukhi hanuman temple मौजा बाबुलखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात निसर्ग पर्यटन स्थळाच्या विकास कामाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार आशिष देशमुख, खासदार श्यामकुमार बर्वे, उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक विनीता व्यास, सहाय्यक वनसंरक्षक यश काळे, मनोज मोहिते आदी उपस्थित होते.
नागपूर वनविभागाच्या वतीने मौजा बाबुलखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात सुमारे ४५५६.३२ लाखांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळामार्फत हा राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे.panchmukhi hanuman temple या प्रकल्पांतर्गत इको पार्क, साहसी उद्यान, बांबू बॉकिंग ट्रेल, व्हाइंग डेक, वाहनतळ, निसर्ग माहिती केंद्र, उपहारगृह तसेच मुलांसाठी खेळणी क्षेत्र अशा विविध सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत.