पाकिस्तानचे उपपंतप्रधान अडखळून पडतात तेव्हा....video

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistan's Deputy PM fallen इस्लामाबादमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार हे इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बदर अब्देललाटी यांचे स्वागत करत असताना अडखळून खाली पडले. या प्रसंगाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सामाजिक माध्यमांवर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी याची खिल्ली उडवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रसंग इस्लामाबादमधील परराष्ट्र मंत्रालयात घडला. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे जात असताना इशाक दार यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना उचलून उभे केले. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
 

Pakistan
दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबिया यांच्यात दोन दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चेचा उद्देश इराणमधील संघर्ष कमी करण्याचा असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेत अमेरिका आणि इस्रायल यांचा थेट सहभाग नसल्याची बाबही चर्चेत आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानने राजनैतिक हालचालींना वेग दिला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ हे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संपर्कात असून, विविध देशांशी संवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.