प्रेयसीचा खून आणि तुकडे ठेवले फ्रिजमध्ये!

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
विशाखापट्टणम,
Pieces of my lover kept in fridge विशाखापट्टणम येथे अत्यंत धक्कादायक खूनप्रकरण उघडकीस आला आहे. एका विवाहित पुरुषाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीची ओळख नौदलात कार्यरत असलेल्या सी.एच. रवींद्र अशी झाली असून, मृत महिलेचे नाव मोनिका असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या शरीराचे भाग फ्रिजमध्ये आढळले आहे, रवींद्र हा विजयनगरम जिल्ह्यातील राजम येथील रहिवासी आहे, तर मोनिका विशाखापट्टणमची रहिवासी होती. शहरातील एल.व्ही. नगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
 

visakhapatnam 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र विवाहित असूनही त्याचे मोनिकासोबत प्रेमसंबंध होते. काही आठवड्यांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून गेली होती. त्यानंतर २९ मार्च रोजी त्याने मोनिकाला स्वतः फोन करून घरी बोलावले. काही काळ ते दोघे एकत्र राहिले, मात्र त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाचे स्वरूप अचानक गंभीर बनले आणि संतापाच्या भरात रवींद्रने मोनिकाची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपीने महिलेच्या मृतदेहाचे काही भाग नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर काही भाग फिजमध्ये ठेवले. तर काही अवशेष दूर फेकून दिल्याचीही माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, खून केल्यानंतर रवींद्र स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला असून पोलिसांनी त्याच्या घरातून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.