विद्यार्थ्यांनी रामकथा प्रश्नमंजुषेत भाग घ्यावा : राधेश्याम चांडक

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
बुलडाणा, 
radheshyam-chandak : सदभावना सेवा समिती बुलडाणा द्वारा दि. ७ एप्रिल पासुन साध्वी सृष्टीलता रामायणीजी यांची रामकथा आयोजित केली आहे. रामकथा मंडपाचे भुमिपुजन विधान परिषद सदस्य धिरज लिंगाडे, सदभावाना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते लहाने ले आऊट, चिंचोले रोड, दि. ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता वाजता संपन्न झाले.
 
 
K
 
 
रामकथेत नऊ दिवस विविध विषयांवर प्रश्नमंजुषा आयोजित केली यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन राधेश्याम चांडक यांनी केले व पालकांनी आपल्या पाल्यांना कथेत पाठवावे अशी सुचना केली. आ. धिरज लिंगाडे यांनी रामकथेसाठी शयतो सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आ. संजय गायकवाड यांनी कथेला शुभेच्छा दिल्या, नगराध्यक्षा न.प., बुलडाणा पुजा गायकवाड यांनी नगर परिषद करुन सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली. सदभावना सेवा समितीचे चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, सुरेश गट्टाणी, तिलोकचंद चांडक, सिध्दार्थ शर्मा, उमेश मुंदडा, सुभाष दर्डा सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. पवन बजाज, कन्हैय्या बंग, अमित महाजन, मधुकर गायकी, गिरीधारी शर्मा, तुषार भट्टड, सागर घट्टे, विजय शर्मा, कमलेश चांडक, लाला माधवाणी, समाधानअप्पा पारसरकर, महेश टावरी, अनंता देशपांडे, मनमोहन शर्मा, पंजाबराव इलग, आनंद वर्मा, दिपक वर्मा (मुख्य यजमान), ललित चोपडा, नितीन जैस्वाल, गजु कुळकर्णी, गजानन भराड, अनंता वाघ, देविदास बावस्कर, शिवाजी देशमुख, पुरनमल शर्मा, आरती शर्मा, संगीता बाहेती, प्रेमा राठी, मनिषा बाहेती, माया शर्मा, जमुना शर्मा, गिता शर्मा, ज्योती तापडीया, अ‍ॅड. सिमा राजोरीया, किरण अग्रवाल, नेहा अग्रवाल, अंजली परांजपे, महाजनताई, पंडीत सचिदानंद पुसदकर उपस्थित होते.