भीषण अपघात; पुलावरून बस कोसळली, ४० प्रवासी सवार

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
शिवमोग्गा,
bus-accident : कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात मोठा बस अपघात घडला असून, प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन पुलावरून खाली कोसळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.
 
 
 
ACCIDENT
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुलावरील कठड्याला धडकून खाली पडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दावणगेरे जिल्ह्यातून भद्रावतीकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.