नागपूर,
Ranjit Meshram रिपब्लिकन चळवळीतील निष्ठावान भीमसैनिक प्रा. रणजीत मेश्राम यांचे दुःखद निधन झाले. ते निडर पत्रकार, साहित्यिक, लोकप्रिय राजकारणी, अभ्यासक आणि ओजस्वी वक्ते म्हणून ओळखले जात होते. बॅरिस्टर राजा खोब्रागडे यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रा. रणजीत मेश्राम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंदौरा येथील आंबेडकर चौकात “आदरांजली सभा” आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी निरंजन वासनिक होते, तर व्यासपीठावर हरिदास रंगरी, मनोहर मेश्राम आणि प्रा. पवन गजभिये उपस्थित होते.

सभेची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. रणजीत मेश्राम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी एसएसडीच्या रत्नमाला गणवीर यांनी भीमगीत सादर केले. Ranjit Meshram सरोज मेश्राम, बाळासाहेब घरडे, अशोक कोल्हटकर आणि निषाद इंदुरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश अंडरसहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश रामटेके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोज जनबंधू, रोशन डोंगरे, मनोज गजभिये, बी. एन. महेशकर, मिलिंद अंबादे, शिवदास उके, मुरली वासनिक, दीपिका गजभिये आणि धीरेंद्र वासनिक यांनी महत्त्वाचे परिश्रम घेतले.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र