क्षयरोग प्रश्नमंजूषेत मेडिकल अव्वली

    दिनांक :30-Mar-2026
Total Views |
-एम्स चमू उपविजेती
-मेडिकलचे आयोजन
नागपूर, 
मेडिकलमध्ये Tuberculosis Day क्षयरोग दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेत मेडिकलचे डॉ. अंजनी तिवारी व डॉ. युसुफ चौधरी यांनी विजेतेपद पटकावले. एम्सच्या डॉ. उत्कर्ष जैन व डॉ. गौतम शंकर उपविजेते ठरले. मेडिकल, अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या पल्मोनरी मेडिसिन व क्रिटिकल केअर विभागातर्फे आंतर वैद्यकीय महाविद्यालयीन पदवीपूर्व प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मेडिकल, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एनकेपी साल्वे मेडिकल कॉलेज, अ.भा. आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आदी 15 संघांनी सहभाग नोंदवला. प्राथमिक फेरीतून पाच संघ अंतिम फेरीत पोहोचले, ज्यामुळे स्पर्धा अधिक रोचक व बौद्धिकदृष्ट्या समृद्ध झाली. प्रश्नमंजूषेचे संयोजन डॉ. सुशांत मुळे व डॉ. अविनाश गांधारे यांनी सांभाळले.
 
 
tbc
 
स्पर्धेचे उद््घाटन मेडिकलचे उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलावार यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राज्य टीबी टास्क फोर्सचे अध्यक्ष व मेडिकल पल्मोनरी मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पल्मोनरी मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. राधा मुंजे व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. सुशांत मेश्राम यांनी क्षयरोगाचा इतिहास, त्यातील वैज्ञानिक प्रगती व आधुनिक उपचार परिपद्धतींची परिणामकारकता यावर सखोल आणि विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषतः तरुणांमध्ये वाढत असलेल्या क्षयरोगाच्या प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली. जनजागृती व सक्रिय उपाययोजनांची गरज अधोरेखित केली.
 
 
Tuberculosis Day  डॉ. उदय नारलावार यांनी क्षयरोगाचा भार ‘नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम’चा विकास व भारतातील क्षयरोग निर्मूलनातील आव्हाने यावर सविस्तर माहिती दिली. डॉ. राधा मुंजे यांनी वारंवार दिसणाèया समस्यांकडे दुर्लक्षाची प्रवृत्ती मुळातच असल्याने भारतात क्षयरोगाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. डॉ. श्रीकांत भैसारे, डॉ. आशीष केंद्रे, डॉ. कुंधा धार्मिक व विभागातील निवासी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाèयांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.