वर्धा,
illiterate-students-took-the-exam : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील असाक्षर व्यतींची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा २९ मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेला १ हजार ५९२ व्यतींनी ही परीक्षा दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुत वतीने राबविण्यात येत असलेल्या नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर साक्षरता चाचणी परीक्षा उत्साहात पार पडली. ज्यांचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि जे कोणत्याही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहिले होते, अशा १५९२ असाक्षरांनी या परीक्षेत सहभाग नोंदवून साक्षरतेच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत असाक्षर व्यतीच्या सोयीनुसार तीन तासांची ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वाचन, लेखन, संख्याज्ञान तीन भागांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. केंद्रावर परीक्षेकरिता आलेल्या असाक्षरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यातील एका केंद्रावर एक दिव्यांग व्यतीने परीक्षा दिली ही उल्लेखनीय बाब आहे. सदर परीक्षेला जिल्ह्यातील आठ तालुयातून ९४१ परीक्षा केंद्रामधून ११२६ महिला व ४७५ पुरुष असे एकूण १६०१ असाक्षरांची परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी ११२२ महिला व ४७० पुरुष अशा १५९२ असाक्षर परीक्षेस उपस्थित होते. जिपच्या शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाकडून या परीक्षा संचालनाची तयारी करण्यात आली होती. परीक्षेकरिता जिल्ह्यास १५३८ नवसाक्षरांचे उद्दिष्ट संचालक कार्यालयाकडून निर्धारित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात उद्दिष्टापेक्षा अधिक १५९२ असाक्षरांनी परीक्षा दिल्याचे शिक्षणाधिकारी (योजना) चंद्रकांत चिलवंते यांनी सांगितले. जिल्हाधिकारी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनात परीक्षा घेण्यात आली.
परीक्षेच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेने महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि संचलनासाठी जिल्हा व तालुका स्तरावरून विशेष भरारी पथक नेमण्यात आले होते. पर्यवेक्षीय यंत्रणेने प्रत्येक केंद्राला भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, असाक्षरांना शिकवणारे स्वयंसेवक, शाळा व्यवस्थापन समिती, नागरिक, जिल्ह्यातील पर्यवेक्षकीय यंत्रणा यांचे सहकार्य लाभले.