34 वर्षे नीट संसार आणि म्हातारपणात साेडली पतीची साथ

- स्वतःहून पतीसाेबत न राहणाऱ्या पत्नीला पाेटगी मिळणार नाही

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
family court पती नाेकरीवर असताना शहरात 34 वर्षे नीट संसार केला. मात्र, पती सेवानिवृत्त हाेताच पत्नीने खेडेगावात राहण्यास नकार दिला. शहरात राहण्याचा हट्ट करणाऱ्या पत्नीने पतीवर पाेटगीसह अन्य खर्च मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयानेसुद्धा पत्नीची याचिका खारिज केली. स्वतःहून पतीसाेबत राहण्यास नकार दिल्यामुळे पत्नीला पाेटगी मिळणार नाही, अशा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
 

family court 
 
 
 
आशिष आणि प्रगती (काल्पनिक नावे) पती-पत्नी असून त्यांना दाेन मुले आहे. आशिष हा यवतमाळ येथील जिल्हा परिषदेत लिपिक पदावर कार्यरत हाेते. त्यांचे उच्चशिक्षित असलेल्या प्रगतीसाेबत लग्न झाले. शासकीय नाेकरीवर पती असल्यामुळे प्रगतीचा स्वभाव खर्चिक झाला. ती नेहमी पैशांचा वारेमाप खर्च करीत असे. नाेकरीनिमित्त आशिष आणि प्रगती मुलांसह यवतमाळ शहरात राहत हाेते. दाेघांचा 34 वर्षे नीट संसार चालला. जून-2018 मध्ये आशिष सेवानिवृत्त झाला. कुटुंबीय आणि मित्र परिवाराला छानशी पार्टी देऊन नवीन वाटचालीसाठी आगेकूच केली. मातीशी नाळ जुळलेल्या आशिष यांना मूळ गावी जाऊन वडिलाेपार्जित घरी राहायचे हाेते. नाेकरीनिमित्त 34 वर्षांपेक्षा जास्त काळ शहरात घालविल्यामुळे आता उर्वरित आयुष्य नैसर्गिक वातावरणात घालवायचे हाेते.
पत्नीचा खेड्यात येण्यास नकार
आशिषने पत्नीला मूळ गावी राहायला जाण्याची कल्पना दिली. मात्र, तिला खेड्यात राहायला जायचे नव्हते. आशिषने स्वतः खेडेगाव गाठले. तर प्रगती दाेन मुलांना साेबत घेऊन यवतमाळमध्येच थांबली. तसेच पतीलासुद्धा तिने शहरात थांबण्यासाठी दम दिला. मात्र, तिला पतीकडून खर्च आणि पाेटगी हवी हाेती. जेणेकरुन ती शहरात राहू शकेल.
 
 
कुटुंब न्यायालयात याचिका
प्रगतीने कुटुंब न्यायालयात पाेटगी आणि अन्य खर्च मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला. तसेच लग्नानंतर आशिष सुरुवातीपासूनच क्षुल्लक कारणांवरून भांडण करीत हाेता. दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण करीत हाेता. त्याचे विवाहबाह्य संबंध हाेते. सेवानिवृत्तीनंतरही त्याचा स्वभाव बदलला नाही. ताे सध्या दुसऱ्या महिलेसाेबत राहत आहे, असे गंभीर आराेप प्रगतीने केले हाेते. परंतु, ती यासंदर्भात ठाेस पुरावे सादर करू शकली नाही. त्यामुळे कुटुंब न्यायालयाने 1 मार्च 2023 राेजी ताे अर्ज फेटाळून लावला.
उच्च न्यायालयाने फटकारले
प्रगतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. उच्च न्यायालयानेही तिला पाेटगीसाठी अपात्र ठरवले. प्रगतीने तीन दशकांच्या सहजीवन काळात आशिषच्या वागणुकीसंदर्भात कधीच तक्रार केली नाही.family court तिचे आशिषवरील सर्व गंभीर आराेप बिनबुडाचे आहेत. आशिष तिला साेबत ठेवण्यास तयार आहे. परंतु, तिलाच खेड्यात राहायचे नाही. त्यामुळे तिने काेणतेही ठाेस कारण नसताना आशिषची साेबत साेडली आहे. करिता, तिला पाेटगी दिली जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.