प.पू. विशेषसागर महाराज यांच्या सानिध्यामध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
बुलडाणा, 
Bhagwan Mahavir Janmakalyanak Mahotsav स्थानिक महावीर नगर स्थित श्री.१००८ चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर, बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव दि. ३० मार्च रोजी साजरा करण्यात आला. सकाळी ७.०० वाजता शोभायात्रेस सुरुवात झाली. महावीर नगर, सरस्वती नगर, अष्टविनायक नगर, केशवनगर, एकता नगर मधुन शोभात्रेचे प्रस्थान झाले. ठिकठिकाणी प.पू.विशेषसागरजी महाराज यांचे पादप्रक्षालण झाले. मोठ्या उत्साहाने दिगंबर जैन बांधव कार्यक्रमात सहभागी झाले. आ. संजय गायकवाड यांनी नविनच बांधुन दिलेल्या भगवान महावीर भवन मध्ये श्रीजींचा अभिषेक, पुजन, पाळणा संपन्न झाला. या प्रसंगी रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यांत आलेले आहे. २५ युवकांनी रक्तदान केले.
 
 
 
JAN NNNN
 
Bhagwan Mahavir Janmakalyanak Mahotsav आ. संजय गायकवाड, नगराध्यक्षा पुजा गायकवाड, युवानेते कुणाल गायकवाड, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, ओमसिंग राजपूत, आशिष जाधव, प्रभाग क्र. १४ च्या नगरसेविका मालती शेवाळे, नगरसेवक सोहम झाल्टे, सुरेश पंढरी शिंदे, आश्रुबा शेवाळे यांचे आगमन झाले. आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. भगवान महावीर भवनाचे लोकर्पण होऊन, मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे परमपूज्य १०८ विशेषसागरजी महाराज यांच्या सानिध्यात पार पडलेले प्रवचन. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी राष्ट्रहितासाठी, धर्मासाठी, देशासाठी व समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेश देत उपस्थितांना प्रेरित केले.व आमदारांना आर्शिवाद प्रदान करुन त्यांच्या हातुन अशीच सर्व समाजाची सेवा होत रहावे अशी भावना व्यक्त केली.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित या लोकार्पण सोहळ्याने श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेश देत बुलढाणा शहराच्या सामाजिक व धार्मिक जीवनात एक नवा अध्याय जोडला. याप्रसंगी मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आ. संजय गायकवाड यांना सकल दिगंबर जैन समाजातर्फे विशेष आभार पत्र प्रदान करण्यांत आले. यानंतर महाप्रसादाचे वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर जैन युवक युवतींनी अथक मेहनत घेतली.