भाजपाची चौथी यादी जाहीर; १३ उमेदवारांना संधी

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
कोलकाता,
BJP's fourth list announced आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष पार्टीने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १३ जणांना उमेदवारी देण्यात आली असून काही ठिकाणी बदलही करण्यात आले आहेत. विशेषतः मैनागुरी मतदारसंघातील आधी घोषित केलेला उमेदवार बदलून आता त्या ठिकाणाहून दलीम रॉय यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या यादीनुसार विविध मतदारसंघांत पक्षाने नवीन चेहरे पुढे केले आहेत. सीताई, नटबारी, बागडा, मगराहत पूर्व, फाल्टा, सोनारपूर उत्तर, हावडा दक्षिण, पांचला, चांदीपूर, गरबेटा, मेमारी आणि बाराबनी या मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
 
 
 
portal
 
यामध्ये बागडा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर यांच्या पत्नी सोमा ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, नुकतेच पक्षांतर करून भाजपामध्ये दाखल झालेले संतोष पाठक यांनाही कोलकात्यातील चौरंगी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. उमेदवारांच्या या यादीमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.