जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश : शेतकऱ्यांवर पुन्हा संकट
यवतमाळ,
Crop damage जिल्ह्यातील काही तालुक्यांत अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे व मालमत्तांचे (घरांचे) टिनपत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात अंदाजे दारव्हा तालुक्यात 42 हेक्टरवरील गहू, तीळ, ज्वारी या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच बाभुळगाव तालुक्यात 2 हेक्टरवरील ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याची नोंद शासनस्तरावर करण्यात आली आहे. तसेच वणी तालुक्यांत वादळी वाèयामुळे एका घराची अंशत: पडझड, पुसद तालुक्यात एका मोठ्या पशुधनाचा मृत्यू आणि वणी तालुक्यात एका घराची पडझड झाल्याची नोंद झाली आहे. या सर्व नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्यात करण्यात येणार आहे. तसे आदेश प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.
Crop damage संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाèयांना शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्याचे यावेळी प्रशासनाने आदेश दिले आहेत. तसेच, नुकसान झालेल्या क्षेत्राचे अ, ब, क, ड या निकषांनुसार निधी मागणी प्रस्ताव तयार करून तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे. घरांसारख्या मालमत्तेच्या नुकसानीसाठीही स्वतंत्र पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत.