भाजपाचे दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान उत्साहात

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
हिवरा संगम, 
Deendayal Upadhyay Training Campaign भारतीय जनता पार्टी महागाव तालुक्यातील तिन्ही मंडळांचे दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान श्री एकवीरा देवी संस्थान येथे 28 व 29 मार्च रोजी उत्साहात पार पडले. यावेळी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार प्रकाश देवसरकर व विजय खडसे, जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. इरफान कुंदन, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष रोहित वर्मा, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
dindayal
 
तसेच पदाधिकारी विलास कवाने, साहेबराव कदम, विलास भुसारे, बुद्धिजीवी आघाडी जिल्हा संयोजक मुकुंद पांडे, जिल्हा उपाध्यक्ष अजय पुरोहित, महेश नाईक, जिल्हा सचिव अमोल चिकने, मंडळ अध्यक्ष श्रीधर भवनकर, निलेश नरवाडे, योगेश वाजपेयी, सतीश कदम, राजू घोतरकर, शरद पाटील, विकास कदम, नितीन कदम, अविनाश जाधव उपस्थित होते. पहिल्या सत्रात ‘भाजपाचा इतिहास आणि विकास’ या विषयावर भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. रविवार, 29 मार्च रोजी द्वितीय सत्र ‘वैचारिक अधिष्ठान’ यावर सुरेश वाघ यांनी मार्गदर्शन केले.
 
 
Deendayal Upadhyay Training Campaign  तृतीय सत्रात ‘भाजपा सरकारची उपलब्धी’ या विषयावर नितीन भुतडा यांनी मार्गदर्शन केले. चौथे सत्र ‘आपली कार्यपद्धती’वर मुकुंद पांडे आणि पाचवे सत्र ‘समाज माध्यमे : एआयची राजकारणातील भूमिका’ यावर शैलेश मुंगे यांनी मार्गदर्शन केले. सहावे सत्र कार्य विस्तार व सुदृढीकरण माजी आमदार नामदेव ससाने, सातवे सत्र बुथ व्यवस्थापन प्रकाश दुधेवार व ‘संघटना’ या विषयावर भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी मार्गदर्शन केले. या महाप्रशिक्षण अभियानाचे प्रस्ताविक मंडळ अध्यक्ष योगेश वाजपेयी यांनी केले. संचालन अभय बोंपीलवार यांनी केले. कार्यक्रमाला महागाव तालुक्यातील तिन्ही मंडळांमधील जिल्हा पदाधिकारी, मोर्चाचे अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.