जबरी चोरी प्रकरणातील आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
वाशीम, 
theft-case : जबरी चोरीच्या घटनांनी हादरलेल्या परिसरात रिसोड पोलिसांनी २९ मार्च रोजी धडाकेबाज कारवाई करत, सशस्त्र आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन गुन्ह्यांचा उलगडा करत एकूण ३ लाख ५७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
 
j
 
 
 
डिसेंबर २०२५ व मार्च २०२६ दरम्यान बिबखेडा शिवार, मोठेगाव तसेच चाकोली परिसरात रात्रीच्या सुमारास घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल व रोख रक्कम लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या निर्देशानुसार रिसोडचे पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. आंतरजिल्हा टोळीतील या आरोपींकडून सोन्या - चांदीचे दागिने, मोबाइल, गुन्ह्यात वापरलेला मोबाइल, एक जिवंत काडतूस, स्टीलचा खंजीर व मोटारसायकल असा सुमारे ३ लाख ५० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
 
 
दरम्यान, २९ मार्च २०२६ रोजी सतीश दत्तराव ठोकरे (रा. चाफेश्वर चौक, रिसोड) यांच्या किराणा दुकानासमोरील १५ लीटरच्या तीन कॅनची चोरी करणारा संतोष विठ्ठल शेळके (रा. दिग्रस कराळे, जि. हिंगोली) याला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून ७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड व सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले व चमूने पार पाडली.