नागपूरमध्ये नि:शुल्क आरोग्य व रक्त तपासणी शिबिर

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Free Health and Blood Checkup राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक समस्या संशोधन आणि लोककल्याण समिती, तसेच नागपूर मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नगरश: लक्ष्मीनगर (सोमलवाडा भाग) येथील हनुमान मंदिर, जुनी अजनी येथे नि:शुल्क स्वास्थ्य शिबिर व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. अंबिका नगर, जुनी अजनी आणि चुनाभट्टी येथील ७६ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी महानगर सहसेवा प्रमुख संजय जोगळेकर आणि लक्ष्मी नगर संघचालक धनंजय कोंडावार उपस्थित होते.

Free Health and Blood Checkup
 
तसेच सेवा विभागातील अनिरुद्ध जोशी, शरद देशपांडे, सुरेश चव्हारे आणि स्वयंसेवकांमध्ये तारसेकर, रामकृष्ण खोडे, भार्गव शर्मा, प्रशांत हारगोडे, येवले, देवीदास फेंडर, शाहू, विलास टेकाडे व ठाकरे उपस्थित होते. Free Health and Blood Checkup या शिबिराचे समन्वयक डॉ. सुशांत झाडे, डॉ. राधा मुंजे, दंत शल्य चिकित्सक डॉ. ठोंबरे, एम्स नागपूर येथील डॉक्टर कृतिका सोनी, जनरल मेडिसिन डॉक्टर क. ल. र., डॉ. सप्रतीव व अस्थिरोग तज्ञ उपस्थित होते. शिबिरादरम्यान नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्त तपासणी आणि आरोग्याबाबत सल्ला देण्यात आला, ज्यामुळे नागरिकांनी आरोग्याबद्दल जागरूकता वाढवली.
सौजन्य: सुरेश चव्हारे, संपर्क मित्र