महागाव तालुक्याला अवकाळीचा जोरदार तडाखा

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
विजांच्या कडकडाटासह पाऊस, रब्बी पिके मातीमोल

महागाव, 
Heavy rains गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यानंतर, महागाव शहरासह संपूर्ण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक झालेल्या विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी संकटामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
 
 
rain
 
दुपारपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. मात्र, संध्याकाळच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले आणि पाहता पाहता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शहरात सखल भागात पाणी साचले असून जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. ग्रामीण भागातही पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच शेतात उभ्या असलेल्या उन्हाळी ज्वारीचेसुद्धा नुकसान झाले असून दाणे काळे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
Heavy rains  पावसामुळे शेतकèयांनी आपल्या जनावरांसाठी जमा करून ठेवलेला हरभरा, तुरीचे कुटार, कडबा ओला झाल्याने जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. अस्मानी संकटामुळे झालेल्या या नुकसानाचे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करावेत आणि बाधित शेतकèयांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

घाटंजी परिसरात पावसाची हजेरी
सोमवारी रात्री अचानक वादळी वाèयासह पावसाने घाटंजी परिसरात हजेरी लावली होती. पिकांचे मोठे नुकासान झाले नसले तरी काही प्रमाणात आंब्याला पावसाचा फटका बसला.