मेंदू विकारांवर त्वरित उपचार अत्यावश्यक: डॉ. स्मृती मुळावकर

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Dr. Smriti Mulavkar "ज्येष्ठ नागरिक महामंडळ, विदर्भ" तर्फे आयोजित ‘मेंदूविकार – उपचार आणि बचाव’ या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. स्मृती मुळावकर यांनी मेंदूविकारांवर त्वरित उपचाराचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, पक्षाघातासारख्या गंभीर आजारांवरही पहिल्या साडेचार तासांत योग्य उपचार केल्यास नियंत्रण मिळवता येते आणि रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते. यासाठी BEFAS (तोल बिघडणे, दृष्टीत बदल, चेहऱ्यातील बदल, हातपायांमध्ये कमजोरी व बोलण्यात अडथळा) ही लक्षणे ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. अशी लक्षणे दिसताच रुग्णाला तात्काळ सिटी स्कॅन सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करावे, असे त्यांनी सांगितले.
 
Dr. Smriti Mulavkar
 
यावेळी त्यांनी पार्किन्सन, अपस्मार, मेंदूतील रक्तस्राव, विस्मरण विकार, चक्कर येणे तसेच अर्धशिशी यांसारख्या मेंदूविकारांची कारणे, लक्षणे, औषधोपचार आणि आवश्यक व्यायाम याबाबत सविस्तर माहिती दिली. Dr. Smriti Mulavkar डॉ. मंगेश मुळावकर यांनी मेंदूवरील आधुनिक शस्त्रक्रिया, कोमा, मेंदूमृत्यू, हृदय व मेंदूची कार्यपद्धती तसेच भूलतज्ज्ञांची भूमिका यावर प्रकाश टाकला. यानंतर दोन्ही तज्ञांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दानवीर कै. दत्ताजी मेघे व श्री दिगंबर वाचासुंदर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी व मार्च २०२६ महिन्यात जन्मदिन असलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. Dr. Smriti Mulavkarअध्यक्षीय भाषणात ॲड. अविनाश तेलंग यांनी मन व मेंदूच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत सकारात्मक विचार, मानसिक संतुलन आणि मेंदूचे व्यायाम यांचे महत्त्व पटवून दिले.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ अंबारे यांनी केले. सूत्रसंचालन राजश्री अंबारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम पातूरकर यांनी मानले. अल्पोपहार व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. Dr. Smriti Mulavkar कार्यक्रमाच्या यशासाठी हेमंत शिंगोडे, अशोक बांदाणे, वसंत बोकडे, विजय मुदकोंडवार, मंजुषा सदावर्ती, भरत महाशब्दे व ईश्वर वानकर यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.
सौजन्य: विनोद व्यवहारे, संपर्क मित्र