स्व. रणजीत मेश्राम यांना आदरांजली

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Indoura Citizens' Action Committee रिपब्लिकन आंदोलनातील एकनिष्ठ भीमसैनिक व ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजीत मेश्राम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंदौरा येथील आंबेडकर चौकात आदरांजली सभा आयोजित करण्यात आली.प्रा. मेश्राम यांचे ४ मार्च रोजी निधन झाले असून ते निडर पत्रकार, साहित्यिक, लोकप्रिय राजकारणी व अभ्यासक म्हणून परिचित होते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
  
 
mate
 
 
 
इंदौरा नागरिक कृती समितीच्या वतीने आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानीनिरंजन वासनिक होते. व्यासपीठावर हरिदास रंगरी, मनोहर मेश्राम व प्रा. पवन गजभिये उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्व. रणजीत मेश्राम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.Indoura Citizens' Action Committee एसएसडीच्या रत्नमाला गणवीर यांनी भीमगीत सादर केले.यावेळी सरोज मेश्राम, बाळासाहेब घरडे, अशोक कोल्हटकर व निषाद इंदुरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत स्व. मेश्राम यांच्या कार्याला उजाळा दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश अंडरसहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज जनबंधू, रोशन डोंगरे, मनोज गजभिये, बी. एन. महेशकर, मिलिंद अंबादे, यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र