लवादा गावाजवळील घटना
धारणी,
Lawada : Pickup van accident धारणीपासून १५ कि. मी. अंतरावर अमरावती-बर्हाणपूर महामार्गावर लवादा गावाजवळ सकाळी पिकअपचा गंभीर अपघात झाला. पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप पुलाखाली कोसळून दोन जण जागीच ठार झाले तर ६ जखमी झाले. पैकी चालक राम व चांदणी नावाची मुलगी यांना अमरावतीला हलविण्यात आले.
Lawada : Pickup van accident ३१ मार्च रोजी सकाळी राम कोल्हे (३२) हा शेतात कामासाठी लवादा गावातून ८ मजुरांना घेऊन शेताकडे पिकअप वाहनातून आणत होता. पुलाजवळ रात्रीच्या वादळामुळे कचरा व लाकूड फाटा पडलेला होता. यामुळे वाहनावरील ताबा सुटून वाहन उलटले. मालती मिठाराम भिलावेकर (१८, रा. लवादा, ता. धारणी) तथा समाय चुन्नीलाल सावलकर (४५, रा. लवादा) हे जागीच ठार झाले. घटना मंगळवार, सकाळची असून सर्व जखमींना कोल्हे कुटुंबाच्या मदतीने व शासकीय रुग्ण वाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय धारणीपर्यंत आणण्यात आले. चालक राम व चांदणी जांबेकर (१९) यांना गंभीर मार असल्याने दोघांना अमरावतीला रवाना करण्यात आले. जखमींमध्ये चालक वगळता सर्व महिला आहेत. घटना सकाळी सहा वाजता अलई नावाच्या पुलाजवळ घडली असून पिकअपचे या दुर्घटनेमुळे खूप नुकसान झाले आहे. धारणी पोलिसांनी प्रकरण नोंदविले आहे. उशीरा प्राप्त माहितीप्रमाणे, राम कोल्हे यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. मेळघाटचे आ. केवलराम काळे तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष (मेळघाट) प्रभुदास भिलावेकर यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.