दूध डेअरीच्या आड माेठा जुगार!

पाेलिसांच्या छाप्यात 8 जुगाऱ्यांना अटक

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
milk dairy gamble दूध डेअरीच्या आड खेळल्या जात असलेल्या एका जुगारावर पाेलिसांनी धाड टाकून 8 जणांना अटक केली. पाेलिसांनी त्यांच्याकडून एकूण 35 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे जुगार खेळणाऱ्यांनी डेअरीच्या बाहेर पहारा देण्यासाठी एक चाैकीदार ठेवला हाेता. काेणी संशयास्पद व्यक्ती आला तर त्याला अडविण्याचे आणि आतमध्ये आवाज देऊन ‘अलर्ट’ करण्याचे त्याचे काम हाेते, पण धाडीदरम्यान पाेलिसांनी सर्वप्रथम त्यालाच ताब्यात घेतले आणि कारवाई केली.
 

दूध डेअरी  
 
नवीन कामठी पाेलिसांनी रविवारी सायंकाळी 7 वाजता हद्दीत राजा यादव यांच्या पावनगाव राेडवरील दादाजी डेअरी येथे कारवाईसाठी गेले हाेते. त्याठिकाणी त्यांना बाहेर चाैकीदार दिसला. पाेलिस आल्याचे पाहून त्याने आतमध्ये आवाज देण्याचा प्रयत्न केला असता पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्या चाैकीदाराला घेऊन पाेलिस आतमध्ये गेले. आराेपी महेश नरेश दावानी (वय 38, रा. लालाओळी, कामठी), कपिल केदारनाथ यादव (वय 40, रा. कामठी), कामेश्वर रमेश श्रीवास्तव (वय 52, रा. सत्ताेरे चाैक, कामठी), याेगेश यादवेश यादव (वय 46, रा. मेन राेड, कामठी), सुदर्शन कमल पाटील (वय 35, रा. निंबाजी आखाडा, कामठी), सुमित प्रकाश महल्ले (वय 23, रा. माेंढा, कामठी), सुशिल पूनमजी बिचपुरीया (वय 57, रा. मेनराेड, कामठी) हे ताशपत्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना सापडले.
 
पाेलिसांनी चाैकीदार आराेपीची चाैकशी केली असता त्याने त्याचे नाव शेख गुलाब शेख अनवर (वय 45, रा. बुनकर काॅलनी, कामठी) असे सांगितले. पाेलिसांनी जुगार खेळणाऱ्या आराेपींजवळून राेख 35 हजार 800 रुपये व 52 ताशपत्ते असा एकूण 35 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आराेपींना जागेबाबत विचारपूस केली असता त्या जागेचा मालक राजा यादव (वय 40, रा. कामठी) हा पळून गेल्याचे सांगितले. आराेपींविरूध्द नवीन कामठी पाेलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात ओला आहे. पुढील तपास पाेलीस करीत आहे.milk dairy gamble ही कामगिरी पाेलिस उपायुक्त डाॅ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलिस निरीक्षक महेश आंधळे, सहा. पाेलीस निरीक्षक सचिन यादव, किशाेर महंत, पाेलीस अंमलदार मिथून शेरे, श्याम गाेरले, नितेश नवघडे, साेनू मेश्राम यांनी पार पडली.