नरेंद्र नगर उड्डाणपुलाखालील रस्त्याची दुरावस्था !

नागरिकांची दुरुस्तीची मागणी

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Narendra Nagar Nagpur नरेंद्र नगर उड्डाणपुलाखालील परिसराचे नागपूर महानगरपालिके तर्फे करण्यात आलेले आकर्षक सौंदर्यीकरण लक्षवेधी ठरत असताना, त्याच ठिकाणच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथे लवकरच लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा सुरू होणार असल्याची चर्चा असली, तरी रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.‘नरेंद्र हाईटस्’ समोरील रस्ता मागील एक वर्षापासून अत्यंत खराब स्थितीत असून, नरेंद्र नगर तसेच मनीष नगर परिसरातील नागरिक या मार्गाचा दररोज वापर करतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार किरकोळ अपघात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

nagar 
 
 
याशिवाय, सिद्धिविनायक गणेश मंदिराकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांचे खोदकाम करून ठेवण्यात आले असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.Narendra Nagar Nagpur प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा रोष वाढत आहे.मोठ्या अपघाताची वाट न पाहता संबंधित प्रशासनाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीची सोय सुधारून अपघातांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सौजन्य:संजय श्रौती,संपर्क मित्र