राज्यातील पाेलिस हवालदारांमध्ये नाराजीचा सूर !

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
पाेलिस उपनिरीक्षक पदावर पदाेन्नती रखडली

अनिल कांबळे
नागपूर, 
Police promotion गेल्या डिसेंबर महिन्यांतच तातडीने महसूल संवर्ग मागितल्यामुळे आता जानेवारी महिन्यातच अंगावर पाेलिस अधिकाऱ्यांची वर्दी चढेल, या आशेने राज्यातील जवळपास चारशेवर पाेलिस हवालदार पदाेन्नतीच्या प्रतीक्षेत हाेते. मात्र, ताेंडावर असलेली पदाेन्नती मार्च महिना संपला तरी पदोन्नती न मिळाल्यामुळे राज्यातील पाेलिस हवालदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
 
 
psi
 
Police promotion  राज्यात पाेलिस उपनिरीक्षक, सहायक पाेलिस निरीक्षक आणि पाेलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या शेकडाे जागा रिक्तआहेत. परिणामतः उपलब्ध पाेलिस अधिकाèयांवर कायदा व सुरक्षेबाबत ताण येत आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यांकडे 5 ते 10 गुन्ह्यांचा तपास देण्यात येत असल्यामुळे अधिकारी वर्ग वैतागला आहे. अशातच डिसेंबर 2025 मध्ये 2013 मध्ये अर्हताप्राप्त 419 पाेलिस हवालदारांना पदाेन्नती देण्याचा निर्णय पाेलिस महासंचालकांनी घेतला हाेता. डिसेंबर महिन्यांत तातडीने संवर्ग मागण्यात आला हाेता. त्यामुळे जानेवारी महिन्यातच पाेलिस उपनिरीक्षक पदावर पदाेन्नती मिळायला हवी हाेती. मात्र, पाेलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्यातील पाेलिस हवालदारांच्या पदाेन्नत्या रखडल्या आहेत. अनेक हवालदारांवर पदाेन्नतीपूर्वीच सेवानिवृत्त हाेण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धाेरणामुळे पदाेन्नतीच्या कक्षेत असलेल्या पाेलिस हवालदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
 
 
गृहमंत्र्यांची सकारात्मकता
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाेन्नती आणि बदल्यांमध्ये पारदर्शकता आणून पाेलिस विभागाला नवा आयाम दिला. पाेलिस दलातील प्रत्येक अंमलदार पाेलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, यासाठी आश्वासित प्रगती याेजनेला बळ दिले. गृहमंत्री फडणवीस यांच्याच कार्यकाळात 2013 अर्हताधारक जवळपास 900 वर पाेलिस हवालदारांना पाेलिस उपनिरीक्षक पदावर पदाेन्नती मिळाली आहे, हे विशेष.
 
 
राज्यात 2 हजार 251 जागा रिक्त
राज्यात पाेलिस उपनिरीक्षकांच्या 2 हजार 551 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक 1681 जागा काेकण परिक्षेत्रात रिक्त असून पुणे परिक्षेत्रात 273 जागा रिक्त आहे. तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून नागपूर परिक्षेत्रात 240 पाेलिस उपनिरीक्षकांच्या जागा रिक्त आहे. पाेलीस अधिकाऱ्यांची वाणवा असल्यामुळे उपलब्ध आणि कार्यरत पाेलिस अधिकाऱ्यांवर अतिरिक्त काम करण्याचा ताण वाढत आहेत.