अपघातग्रस्त कुटुंबाला आधार
बुलढाणा,
जुनागाव (भिलवाडा) येथील स्वर्गीय किशोर गोंधणे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटात आ. Sanjay Gaikwad संजय गायकवाड यांनी मदतीचा हात पुढे केला. गायकवाड यांच्या पुढाकारातून कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत तसेच सहा महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा किराणा देण्यात आला.
जुनागाव भिलवाडा येथील किशोर गोंधणे यांचा २० मार्च रोजी कामावर जात असताना चिखली रोडवर अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती तसेच मेंदूला जबर मार बसला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती साथ न दिल्याने त्यांचे निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे गोंधणे कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब आमदार संजय गायकवाड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ दखल घेतली. आज दि. ३१ मार्च २०२६ रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात कुटुंबीयांना बोलावून स्व. गोंधणे यांच्या पत्नी जयश्री गोंधणे यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सहा महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा किराणा देखील देण्यात आला.
Sanjay Gaikwad या प्रसंगी गटनेता मृत्युंजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,धर्मवीर युथ फाउंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड,किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, शिवसेना महिला आघाडी जिल्हा समन्वयक अनुजा सावळे, बंडू आसाबे, नगरसेवक बबलू मावतवाल,स्वीय सहाय्यक श्रीकृष्णभाऊ शिंदे, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गोंधणे कुटुंबातील जयश्री गोंधणे व त्यांचे चिरंजीव प्रेमकिशोर गोंधणे यांचीही उपस्थिती होती.