पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराणाचा पहिला दिवस
लाखाच्यावर भक्त उपस्थित
आर्णी,
Shiva Mahapuran आर्णी येथील सिद्धेश्वरनगरीमध्ये शिवकथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी पहिल्या दिवशी कथा सांगताना, उपस्थित असलेल्या सव्वा लाख भक्तांना, मानवी शरीर अनमोल आहे, आपण त्याचा अपव्यय करू नये. सर्व दोष मानवी शरीरातच असतात. शिवकथा सांगते की, मानव आणि महादेव वेगळे आहेत, दोघांमध्ये खूप मोठे अंतर आहे. मानव दिवसभर चुका आणि दोष शोधत बसतो किंवा दोष शोधण्याचा प्रयत्न करतो. महादेवाला आपल्या भक्तांमध्ये कोणतेही दोष दिसत नाहीत. त्यांना त्यांचे सद्गुण व चांगुलपणा दिसतो, असे सांगितले.
कोणतीही आई आपल्या मुलांना चुकीचा सल्ला देत नाही, ती त्यांच्यात चांगली संस्कारमूल्ये रुजवते. शिव महापुराणाची कथा सांगते की तुम्ही मंदिरात जावे. शिवपुराण सांगते की तुम्ही वाईट विचार, वाईट कृत्ये, वाईट सवयी अंगीकारू नयेत. भगवान शंकर दिखाऊ नाहीत. आपल्या मनात भीती असेल, तर तुमची उपासना स्वीकारली जाणार नाही, असे पंडितजींनी सांगितले.
आपल्या उपासनेत चुका झाल्या तरी घाबरू नका, ती उपासना स्वीकारली जाईल. माणसांना दिखाऊपणाची गरज असते, पण शंकर महादेवांना दिखाऊपणा नको आहे. तुम्ही आपल्या हृदयातून भीती दूर करा, तुमची पूजा सफल होईल, देव शंकर तुमची पूजा स्वीकारतील. तुमची जी इच्छा असेल, तुमच्या मनाची जी आकांक्षा असेल, ते शिव स्वीकारतील. भीती दूर करा, जिथे भीती आहे, तिथे देव नाही; जिथे देव आहे, तिथे भीती नाही, असे शिवपुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी सात दिवसीय कथेच्या पहिल्या दिवशी सांगितले.
Shiva Mahapuran दुपारी 1 वाजता कथेला सुरुवात झाली. ज्यामध्ये पहिल्या दिवशी गोपाळ कोठारी यांनी सपत्नीक शिव महापुराण पोथी मंचावर आणली. त्यांच्यासह शंकर मारबते व निलेश गावंडेसह इतरांनी पूजा केली. कथा मंडपात पहिल्या दिवशी, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार प्रा. राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, माजी आमदार कीर्ती गांधी, कामगार उपायुक्त राजेश आडे, गणपती मंदिर संस्थानच्या अध्यक्ष नीता आडे, राजेंद्र डांगे, विजय कोषटवार, संत योगेश महाराज, डॉ. ज्ञानेश्वर भारतींसह इतर संत उपस्थित होते. कथा दुपारी 4 पर्यंत सुरू होती. पहिल्या दिवशी 1 लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बहिरम देव शिव पुराण कथा समितीच्या कार्यकारिणी व विभिन्न समिती पदाधिकाèयांनी परिश्रम घेतले. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
22 विशेष बसफेèया
शिवमहापुराण कथेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष बसफेèयांचे नियोजन केले आहे. विविध आगारांतून 22 बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, पांढरकवडा, नेर, राळेगाव आगार बसस्थानकावरून प्रत्येकी दोन, तर दारव्हा व दिग्रस आगारातून प्रत्येकी चार बसेस सोडल्या जाणार आहेत. आर्णी बसस्थानकावरून जादा वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी राजू उईके, गजानन पोले, गजानन खंडाते, वाकोडे, देवेंद्र धारवट, तलवटकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार
आर्णी येथे Shiva Mahapuran शिवमहापुराण कथेस प्रारंभ झाला आहे. कथास्थानी आरोग्याच्या दृष्टीने मदतीचा सहभाग म्हणून श्री सत्यसाई सेवा समितीतर्फे मोफत वैद्यकीय सेवा तपासणी व औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. कथा सप्ताहादरम्यान भाविकांनी वैद्यकीय सेवेची मदत लागू शकते, ही बाब लक्षात घेऊन मेडिकल व्हॅन व डॉक्टरसुद्धा उपलब्ध आहेत.