शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल त्वरित द्या

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
अन्यथा शेतकऱ्यांचा 3 एप्रिलपासून घंटानाद

उमरखेड, 
वसंत सहकारी Sugar factory साखर कारखानाद्वारा भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड, पोफाळी या कारखान्याकडे यावर्षी गाळपास आलेल्या उसाच्या बिलांची रक्कम अद्यापही न मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी महाव्यवस्थापकांना निवेदन देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 14 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत गाळपास आलेल्या उसाची रक्कम शासनाच्या नियमांनुसार 14 दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना, अद्यापही संबंधित रक्कम शेतकèयांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून दैनंदिन गरजा भागवणेही कठीण झाले आहे.
 
 
shetkari
 
Sugar factory सध्या लग्नसमारंभ व इतर कौटुंबिक कार्यक्रमांचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासत आहे. त्यातच बँक व पतसंस्थांच्या कर्जाची परतफेड ‘मार्च एंडिंग’पूर्वी न झाल्यास व्याजाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने शेतकरी अधिकच चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या 31 मार्चपर्यंत उसाची थकीत रक्कम अदा करण्यात आली नाही, तर 3 एप्रिलपासून कारखान्यासमोर घंटानाद करत बेमुदत उपोषणही करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी कारखाना प्रशासनावर राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.