अवकाळी पावसाचा भाजीपाला, बिजवाई कांद्यासह फळपिकाला फटका

आणखी तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाजाने शेतकरी चिंतातूर

    दिनांक :31-Mar-2026
Total Views |
वाशीम,
unseasonal-rains : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजाताच्या सुमारास अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यात एकच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाने भाजीपाला, फळपिके, तसेच रब्बी हंगामातील गहू आणि बिजवाईच्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. ३ एप्रिल पर्यंत पावसाची शयता वर्तविल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली.
 

k 
 
 
 
हवामान विभागाने ३० मार्च ३ एप्रिल पर्यंत काही ठिकाणी अवकाळी पावसाची शयता वर्तविली होती. त्यानुसार सोमवारी ३० मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता दरम्यान अनेक भागांत वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांसह झालेल्या पावसामुळे अल्पावधीतच रस्त्यांवर पाणी साचले. अचानक आलेल्या या बदलामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांच्या नुकसानीची भीती वाढली आहे. विशेषतः बिजवाईचा कांदा, गहू, तसेच इतर रब्बी पिकांना मोठा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, पुढील काही दिवस हवामान आणखी बिघडण्याची शयता व्यक्त होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.
 
 
जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, मंगरुळनाथ, मानोरा, कारंजा, मालेगाव तालुयातील अनेक भागांत सोमवारी दुपारनंतर झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. गव्हाचे पीक आडवे झाले असून, फळबागांना मोठा फटका बसला आहे. त्यातच यंदा जोरदार बहरलेल्या आंबा पिकाचेही या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वादळीवार्‍यासह झालेल्या गारपिटीने आंब्याची फळे गळून पडली.
 
 
जिल्ह्यातील काही भागाता सोमवारी सायंकाळी ६ वाजता ते १० वाजेपर्यंत ठिकठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस पडला. त्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली. याशिवा वादळी वार्‍यामुळे रात्रभर वीजपुरवठा देखील खंडील झाला. त्यामुळे वयोवृध्द व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला. तास पाऊस येतो आणि रात्रभर वीज पुरवठा खंडीत होते याकडे वरिषठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.