रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट
समाजमाध्यमांवरील बातमी दिशाभूल करणारी
यवतमाळ,
यवतमाळ येथील Vasantrao Naik Government Hospital वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात खोकल्याच्या औषधी कालबाह्य नाहीत, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आले. बॅच नंबर व मुदत कालावधी मिटलेली खोकल्याची औषधी वितरित केल्याबाबत समाज माध्यमांवर प्रसारित चुकीच्या बातमीच्या अनुषंगाने शासकीय रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण केले असून त्यानुसार खोकल्याची औषधी मुंबईच्या हाफकिन महामंडळाकडून शासकीय रुग्णालयास एप्रिल 2025 मध्ये पुरवठा झालेली आहे.
Vasantrao Naik Government Hospital पुरवठा घेताना बॅच नंबर व मुदत कालावधी तपासूनच व पुराव्यादाखल त्याचे छायाचित्र जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. तसेच त्याची विभागांतर्गत पार्सल रजिस्टर व जडसंग्रह नोंदवहीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. समाज माध्यमातील बातमीनुसार वितरित बाटलीवर नोंदी मिटलेल्या आढळत असल्याचे म्हटले आहे. एप्रिल 2025 पासून आजतागायत वातावरणाच्या परिणामामुळे या नोंदी मिटल्या असण्याची शक्यता आहे. परंतु औषध भांडारातील उपलब्ध दस्ताऐवजानुसार खोकल्याची औषधी कालबाह्य झालेली नसून त्याची कालबाह्य मुदत फेब्रुवारी 2027 आहे. या रुग्णालय प्रशासनाच्या स्पष्टीकरणानुसार ही औषधी वाटप करताना ज्या औषधी निर्मात्याने ती वाटप केली आहे, त्याने या नोंदी पुन्हा एकदा तपासणे आवश्यक होते. परंतु रुग्णांच्या गर्दीमुळे अनावधानाने ही प्रकिया घडली नाही. या खोकल्याची औषधी कालबाह्य नसल्याचे वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.